हे आहे एक प्रेमगीत …कोणा एका विदेशींनी ला उद्देशून केलेले…
चिनी म्हणजे ओळखणं… साखरेला पण चिनी म्हणतात आणि चिनी म्हणजे ओळखणे किंवा जाणणे असा आणखी एक अर्थ होतो…..एकाच शब्दाचे दोन वेगळे वेगळे अर्थ होतात…असाच एक शब्द ‘चेष्टा ‘… मराठी चेष्टा म्हणजे कुणाला तरी चिडवणे..तर बांगला ‘चेष्टा’ म्हणजे प्रयत्न …😊…त्यामुळे घरी कधी कधी असे संभाषण होते..कधी कोणी म्हटले ‘आमि चेष्टा कोर छि ‘ कि विचारणा होते ‘बांगला चेष्टा कि मराठी चेष्टा ‘ 😂…
माझ्या मिस्टरांच्या नोकरी निमित्त तैवानला सात वर्षे राहिलो.. तिथे चिनी (traditional mandarin) भाषेशी तोंड ओळख झाली..त्या भाषेत चार ला ‘स्स ..’ म्हणतात..पण स्स चा दुसरा अर्थ ‘मृत्यू’ असा पण होतो..त्यामुळे त्या देशात कुठेही चार नंबरचे घर नाही..चार नंबर चा रस्ता नाही..हॉस्पिटल मध्ये ४ नंबर चा बेड पण .नसतो…आणि लिफ्ट मध्ये तिसऱ्या मजल्या नंतर एकदम पाचव्या मजल्याचे बटन असते..चौथा मजला नेहमीच गायब..भाषेच्या अशा गमती जमती.. …
तर हे विदेशींनी साठी रवींद्र नाथानी लिहिलेली कविता बांगला भाषेत…
हे गाणे मराठीत..
आमी चिनी गो चिनी तोमर ओ गो विदेशिनी .
(हे विदेशींनी, ओळखतो मी तुला….)
तुमि था को सिंधू पारे ओ गो विदेशिनी . ..
(सागर पार घर तुझे…)
तोमाय देखे छि शारद प्राते , तोमाय देखे छि माधोबी राते ,
(तरी, तुला पाहतो शरद (ऋतूच्या ) सकाळी..(आणि) चांदण्या रात्री…)
तोमाय देखे छि हृदि माझारे ओ गो विदेशिनी . …
((आणि) माझ्या हृदयी, हे विदेशिनी . …)
आमि आकाशें पा ति या कान शुने छि शुने छि तोमारी गान ,
(आकाशा लावून कान , ऐकतो तुझे गाणे….)
आमि तोमारे सोपे छि प्राण ओ गो विदेशिनी . ..
(तुला सोपवले मी प्राण .. हे विदेशिनी ….)
भुवन भ्रमिया शेषे आमि ऐशे छि नूतन देशे ,
(सर्वत्र फिरून शेवटी मी आलो एका नवीन देशात..)
आमि अतिथी तोमारी द्वारे ओ गो विदेशिनी . …
(अतिथी मी तुझ्या द्वारी…हे विदेशिनी . ..)
ह्या कवितेचा इंग्लिश अनुवाद ….
I KNOW, I know thee, O thou Bideshini*; thou dwellest on the other shore of the ocean.
I have seen thee in the autumn, I have felt thee in the spring night. I have found thee in the midst of my heart, O thou Bideshini.
Putting my ear to the sky* I have heard thy music, and I have offered to thee my life, O thou Bideshini.
I have roamed all through the world and have come at last into the strange country. Here I am a guest at thy door, O thou Bideshini.
[*Bideshini: O thou stranger lady ; perhaps, Intellectual Beauty.
**Akasa, space: the source of all sound and speech.]
— The Music of Hindostan by A H Fox Strangways (1914).
हे गाणे सत्यजित राय ह्यांनी ‘चारुलता ‘ मध्ये चित्रित केले आहे…किशोर कुमार ह्यांच्या आवाजात…