माझ्या मिस्टरांच्या नोकरी निमित्त विविध ठिकाणी फिरताना बऱ्याच ओळखी झाल्या..कित्येक तर अगदी जिवाभावाचे सोबती झाले…तैपेई (तैवान) मधील एक दीदी..आमच्या बिल्डिंग मध्येच तळ मजल्या वर राहायची..आमच्या चिकन करी चा वास बिल्डिंगच्या कॉरिडॉर मध्ये पसरला कि लगेच धावत येऊन सगळे जेवण आवडीने खायची..मला म्हणाली मी तुझी मोठी बहीण..कधीही हाक मार..अजून हि तिच्याशी तीच जवळीक आहे..
मिस्टरांचे पोस्टिंग ब्रिस्टॉल (UK) ला होते तेव्हा युरोप ट्रिप करायाची संधी मिळाली.. युरोस्टार ने पॅरिस ला गेलो..Christmas ची सुट्टी होती..पॅरिस पूर्ण टुरिस्ट लोकांनी गजबजलेले..माझ्या मुलाचा वाढदिवस होता..रोज बाहेरचे जेवण खाऊन तो कंटाळला .होता.त्याला घरची चिकन करी खायची इच्छा होती…आम्ही एक अपार्टमेंट भाड्याने घेतले होते..जवळच एका दुकानातून चिकन खरेदी करायला गेलो… दुकान दारा ने लगेच ओळखले आम्ही भारतीय..म्हणाला मी पण भारतीय .. पण काश्मीरी ..Pakistan Occupied Kashmir मध्ये त्याचे घर..त्याच्या बरोबर दोन बांगलादेशी सहकारी काम करत होते..त्या सगळया बरोबर खूप गप्पा झाल्या..मला म्हणाला तुम्ही इथे परक्या ठिकाणी कसा काय स्वयंपाक करणार? मसाला नसेल तुमच्या कडे? मी म्हणाले असेच हळद तिखटावर टाकेन..त्याने लगेच आत जाऊन काश्मिरी मसाल्याची पाकिटे आणून दिली..म्हणाला..हा मसाला टाकून केलेत तर बाकी काही लागणार नाही..एक वेगळाच चवदार मसाला होता तो..ती चव विसरणे अशक्य..
अशी किती माणसे भेटली आणि अजून हि भेटत राहतात..रवींद्र नाथाचे हे गाणे ह्याच आशयाचे आहे… ते म्हणतात..हे प्रभू, कितीतरी अनोळखी माणसे तू ओळखीची केलीस.. अनेक घरात तू मला स्थान दिलेस आणि दूर असलेल्याना केलेस मित्र तर परक्याना केलेस तू निकटवर्ती …
কত অজানারে জানাইলে তুমি, কত ঘরে দিলে ঠাঁই–
দূরকে করিলে নিকট, বন্ধু, পরকে করিলে ভাই॥
পুরানো আবাস ছেড়ে যাই যবে মনে ভেবে মরি কী জানি কী হবে–
নূতনের মাঝে তুমি পুরাতন সে কথা যে ভুলে যাই॥
জীবনে মরণে নিখিল ভুবনে যখনি যেখানে লবে
চিরজনমের পরিচিত ওহে তুমিই চিনাবে সবে।
তোমারে জানিলে নাহি কেহ পর, নাহি কোনো মানা, নাহি কোনো ডর–
সবারে মিলায়ে তুমি জাগিতেছ দেখা যেন সদা পাই॥
हेच गाणे मराठीत..
क तो अजाना रे जाना इ ले तुमि, क तो घरे दिले ठाई –
( अजाना रे – अनोळखी , ठाई – ठिकाणा )
दूर के कोरिले निकट बंधू, पर के कोरिले भाई ..
( कोरिले – केले ..)
पुरानो आवास छेडे जाई जबे मने भेबे मरि कि जानी कि होबे –
( जुने घर सोडल्यावर वाटते काय होणार आता काय माहित..पुरानो आवास छेडे – जुने घर सोडून, भेबे – विचार करणे ,,)
नूतनेर माझे तुमि पुरातन शे कथा जे भुले जाई …
(नूतन ठिकाणी हि तुझाच वास आहे हे मी का विसरतो..)
जीवने मरणे निखिल भुवने जखनी जेखाने ल बे ..
(जीवन मरण (प्रसंगी) किंवा कुठल्या हि ठिकाणी तू घेऊन गेलास तरी )
चिर जनमेर परिचित ओहे तुमि इ चिनाबे सबे …
(चिर परिचित असा तू माझ्या सोबत असणार आहेस ..)
तोमारे जाणिले नाहि केह पर, नाहि कोनो माना, नाहि कोनो डर —
(तुला जाणल्यावर मला नाही कसली चिंता व कुणाची भीती… )
सबारे मिलाये तुमि जागीतेछो देखा जेनो सदा पाइ …
(सगळ्यामध्ये वसलेला तू मला सर्वत्र भेटावास हीच प्रार्थना…)
ह्या गाण्याचे इंग्लिश रूपांतर ..
THOU hast made me known to friends whom I knew not. Thou hast given me seats in homes not my own. Thou hast brought the distant near and made a brother of the stranger.
I am uneasy at heart when I have to leave my accustomed shelter; I forget that there abides the old in the new, and that there also thou abidest.
Through birth and death, in this world or in others, wherever thou leadest me it is thou, the same, the one companion of my endless life who ever linkest my heart with bonds of joy to the unfamiliar.
When one knows thee, then alien there is none, then no door is shut. Oh, grant me my prayer that I may never lose the bliss of the touch of the one in the play of many.
— Rabindranath Tagore, Gitanjali (Song Offerings).
हे गाणे इथे देत आहे सुचित्रा मित्र ह्यांच्या आवाजात —