কবি প্রণাম ( कवी प्रणाम )

रबिन्द्र साहित्यावर लिहायचे तर ठरवले.. पण कुठून सुरुवात करू कळेना..एकदा वाटले लघु कथेवर लिहावे..कितीतरी गोष्टी ..गोरा, चोखेर बाली, नष्टनिड…तशाच दीर्घ कथा..कादंबरी ..कविता..गाणी..प्रवास वर्णने आहेत…आताच एक छानशी गोष्ट वाचली कवींच्या जीवनातील …ती इथे लिहिते..मूळ बांगलातील आहे..

बिधूशेखर शास्त्री आणि क्षितिमोहन सेन महाशय, हे दोघे संध्याकाळी फिरत फिरत अनेकदा रवींद्रनाथाकडे जात असत..

एक दिवस, ते रविंन्द्र नाथांना बोलले, “चला, आपण कविता लिहायचा खेळ खेळुया .. तो कसा?? तर एकजण एक line कविता लिहील आणि दुसरा ती पूर्ण करेल.”

रवींद्र नाथांच्या टेबल वरून वही आणि पेन घेऊन विधुशेखर शास्त्रीनी लिहिले –

“কৃষ্ণপ্রেমে সবাই পাগল, রাধাই শুধু কলঙ্কিনী”

“कृष्णप्रेमे साबाई पागोल, राधाई शुधु कलंकिनी”

“कृष्णप्रेमात सर्वच वेडे, परंतु राधाच होते कलंकिनी”

रविंद्र नाथांनी दुसरी ओळ लिहिली..

“সবাই কলম ধার করে নেয়, আমিই কেবল কলম কিনি।”

“शबाई कलम धार को रे नेय , आमीइ शुधू कलम किनी “

कवींच्या ओळी चा अर्थ – “सगळेच पेन्सिल उधार करतात .. मीच काय तो (पेन्सिल ) विकत घेतो”..

कलम = पेन्सिल , धार = उधार , आणि किनी = विकत घेणे ..

सगळेच हसू लागले आणि कविता लेखनाचा खेळ पण तिथे च संपला…

(পূণ্যময় সেন : “শান্তিনিকেতন – কিছু স্মৃতি” থেকে গৃহীত )

( मूळ कथा – शांतिनिकेतन – किछू स्मृती तून साभार.. मूळ लेखक – पून्यमय सेन )

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.