तुमि एपार ओपार करो के गो …

विस्तृत पणे वाहणारी गंगा नदी पश्चिम बंगाल चे एक प्रमुख अंग…पश्चिम बंगाल मध्ये कुठेही प्रवासाला गेले कि बऱ्याच वेळा गंगा नदी पार करावी लागते…

चार वर्षांपूर्वी मायापुर गेलो होतो…तिथे इस्कॉन चे मुख्य मंदिर आहे..अगदी स्पेशल गाडी करून सकाळ सकाळी प्रवासाला सुरवात केली…रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोहरीची आणि बटाट्याची शेती ..ग्राम बांगला वर्ष भर हिरवागार असतो..गंगेच्या पाण्यावर वर्ष भर शेती होते..पण रस्ता इतका खराब … खड्डया मुळे हाडे खिळखिळी व्हायची वेळ आली.. त्यात अध्ये मध्ये रेल्वे चे गेट पडत होते..तिथे बऱ्याच जागी रेल्वे ट्रॅक रस्त्यामधून जातात..त्यामुळे गेट पडून बराच वेळ रेल्वे जायची वाट पाहावी लागते…असे करत पोहोचायला दुपार झाली…

मायापुर च्या मंदिरात देवाचे दर्शन, आणि दुपारचा प्रसाद घेतला.., सुंदर साधे शाकाहारी जेवण.. नंतर तिथली गोशाळा बघितली..आजूबाजूला पण बरीच लहान लहान मंदिरे आहेत..ते सगळे बघता बघता संध्या काळ झाली..मग ठरवले गाडीने जाण्यापेक्षा ट्रेन ने जावे..लवकर घरी पोहोचता येईल…जवळचे ट्रेन स्टेशन नब द्वीप ..तिथे जायला गंगा पार करावी लागणार होती..जवळच्याच घाटावरून एका मोटर बोट मध्ये चढलो..मोटर बोट ला बांगला त भट भटी म्हणतात..आता काळोख झाला होता..गंगे चे पाणी चंद्राच्या प्रकाशात चमकत होते..आणि पाण्यावर धुक्याचा एक पट्टा तयार झाला होता…बोटीत खूप गर्दी होती..बहुतेक सगळे मायापुर ला येणारे भाविक..पण सगळे शांत बसले होते..फक्त भटभटी चा पाणी कापत जायचा आवाज ..ती गंगा फेरी खरंच अविस्मरणीय…

आम्हाला तीरावर उतरवून बोट परत मंदिर जवळील तीराला निघाली…

ह्या नौकेच्या ह्या किनाऱ्या वरून त्या किनारी जाण्यालाच रवींद्रनाथ जीवन आणि मृत्यू च्या दृष्टीकोनातून बघतात..नावाड्याची म्हणजेच ईश्वराची नौका सर्वाना ह्या तीरावरून जीवन पार करून पैल तीरावर घेऊन जाते असे ते ह्या गाण्यात म्हणतात…वडील देवेंद्र नाथ ह्यांच्या मृत्यू पश्चात रवींद्र नाथानी हे गाणे रचले…

তুমি   এ-পার ও-পার কর কে গো ওগো খেয়ার নেয়ে?
     আমি   ঘরের দ্বারে বসে বসে দেখি যে সব চেয়ে॥
           ভাঙিলে হাট দলে দলে   সবাই যাবে ঘরে চলে
           আমি তখন মনে ভাবি, আমিও যাই ধেয়ে॥
     দেখি   সন্ধ্যাবেলা ও পার-পানে তরণী যাও বেয়ে।
     দেখে   মন যে আমার কেমন করে,   ওঠে যে গান গেয়ে
                 ওগো খেয়ার নেয়ে॥
           কালো জলের কলকলে   আঁখি আমার ছলছলে,
           ও পার হতে সোনার আভা পরান ফেলে ছেয়ে।
     দেখি   তোমার মুখে কথাটি নাই ওগো খেয়ার নেয়ে–
     কী যে  তোমার চোখে লেখা আছে দেখি যে সব চেয়ে
                 ওগো খেয়ার নেয়ে।
           আমার মুখে ক্ষণতরে   যদি তোমার আঁখি পড়ে
           আমি তখন মনে ভাবি  আমিও যাই ধেয়ে
                 ওগো খেয়ার নেয়ে॥

हे गाणे मराठीत…

तुमि ऐ पार ओ – पार करो के गो ओगो खेयार नेये ?

(कोण नावाडी हि नौका ऐल तीरा वरून पैल तीरी वाहतोय..? खेया – नौका …नेया – नावाडी …)

आमि घरेर द्वारे बसे बसे देखि जे सब चेये …

(दारी बसून मी हे सर्व अद्भुत निरखत राहतो...)

भांगिले हाट दले दले सबाई जाबे घरे चले

(आपापला व्यवहार संपवून सगळेच जाणार आपापल्या घरी.. हा ट – बाजार ...)

आमी तखन मने भाबि, आमिओ जाई धेये ..

(अशा वेळी मला वाटते मी हि जावे (तुझ्या सोबत) वाहून..)

देखि संध्या बेला ओ पार -पाने तरणी जाओ बेये ..

(संध्या काळी पैल तीरी नौका चाललीये ..)

देखे मन जे आमार केमॉन करे , उठे जे गान गेये

(अशा वेळी माझ्या अस्वस्थ मनी हे गाणे स्फुरते..)

ओगो खेयार नेये …

(हे प्रभू…)

कालो जलेऱ कल कले , आँखी आ मार छलो छले ,

(सावळ्या पाण्याचा कलरव …आणि माझ्या डोळ्यात पाणी..)

ओ पार होते सोनार आभा परान फेले छेये ..

(पैल तीरावर पसरलेला सोनेरी प्रकाश …)

देखी तो मार मुखे कथा टि नाई ओगो खेयार ने ये–

(परंतु तू (हे प्रभू) निशब्द..)

कि जे तोमार चोखे लेखा आछे देखी जे सब चे ये

(तुझ्या डोळ्यात काय लिहिलेय मी जाणण्याचा वृथा प्रयत्न करतो…चोख – चक्षु , डोळे )

ओगो खेयार नेये …

(हे प्रभू…)

आमार मुखे खनतरे जदि तोमार आंखि पडे

(जर क्षण भर तुझी दृष्टी माझ्या वर पडली तर…)

आमि त ख न मने भा बि आमि ओ जाई धेये ..

(मलाही जावेसे वाटते (तुझ्यासोबत ) वाहून…)

ओगो खेयार नेये …

(हे प्रभू…)

ह्या कवितेचा कवींनी केलेला इंग्लिश अनुवाद..

WHEN the market is over and they return homewards through the dusk,
   I sit at the wayside to watch thee plying thy boat,
    Crossing the dark water with the sunset gleam upon thy sail;
   I see thy silent figure standing at the helm and suddenly catch thy eyes gazing upon me;
   I leave my song; and cry to thee to take me across. 
 

— Lovers Gift and Crossing, Macmillan, London, 1918.

हे गाणे गायले आहे सागर सेन ह्यांनी..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.