सहसा डाल पाला तोर …

आज एक होळीचे गाणे ऐकुया..होळी म्हणजे ‘दोल जात्रा’ .. शांतिनिकेतन मध्ये वसंत उत्सव साजरा होतो..सगळी कडे रंगाची, गाण्याची आणि नृत्याची उधळण असते.. काही वर्षा पूर्वी शांती निकेतन चा वसंत उत्सव अनुभवाला होता..तिथे शक्यतो अबीर, गुलाल आणि नील हे रंग वापरतात..पाण्याचा वापर नसतो..एक मेकाला सगळे हलकेच रंग लावतात..कुठेही जबरदस्ती किंवा दंगा नसतो…एव्हढी गर्दी पण एक आत्मसयंम सगळी कडे दिसून येतो…

तिथे रेकॉर्ड वाजवून नाच होत नाही.. पार्श्व भागी संगीत भवनातले विद्यार्थी आणि शिक्षक गात असतात आणि विविध वाद्य वाजवून साथ देत असतात..सगळी कडे फुलांनी बहरलेले पांगारा, चाफा इत्यादी वृक्ष आणि त्यांच्या छायेत तशीच हिरव्या पिवळ्या आणि लाल वेष भुषेत नाच गाण्याच्या तालावर रंग खेळला जातो….एक आगळा वेगळा अनुभव..त्या उत्सवामध्ये तिथल्या कला भवनातल्या शिक्षकांनी ह्या गाण्यावर सुंदर नृत्य प्रस्तुत केले..ह्या गाण्यात रवींद्रनाथ फुलांनी बहरलेल्या चाफा आणि करबी (कण्हेर ) च्या झाडांना उद्देशून म्हणताहेत ..कुठल्या देशीचे सूर आणि कुणाचे नुपूर तुमच्या पाना फुलात वाजताहेत?? कोणी तुम्हाला इतक्या रंगात सजवले?? ह्या आकाशात कोणाला पाहून तुम्ही इतके फुलून आलात??..

সহসা     ডালপালা তোর উতলা যে,   ও চাঁপা,   ও করবী!
      কারে তুই   দেখতে পেলি আকাশ-মাঝে জানি না যে॥
কোন্‌ সুরের মাতন হাওয়ায় এসে   বেড়ায় ভেসে,   ও চাঁপা,   ও করবী!
      কার নাচনের নূপুর বাজে   জানি না যে॥
                তোরে   ক্ষণে ক্ষণে চমক লাগে।
           কোন্‌ অজানার ধেয়ান তোমার মনে জাগে।
কোন্‌   রঙের মাতন উঠল দুলে   ফুলে ফুলে   ও চাঁপা,   ও করবী!
              কে সাজালে রঙিন   সাজে জানি না যে॥

हे गाणे .मराठीत..

सहसा डालपाला तोर उतला जे, ओ चांपा, ओ कोरोबी ..

कारे तुई देखते पेलि आकाश माझे जानि ना जे…

कोन सुरेर मातन हवाय ए शे बेडाय भेशे, ओ चांपा, ओ कोरोबी ..

कार नाचनेर नुपूर बाजे जानि ना जे …

तोर खणे ख णे चमक लागे..

कोन अजानार ध्येयान तोमार मने जागे ..

कोन रंगेर मातन उठलो दुले फुले फुले ओ चांपा, ओ कोरोबी ..

के साजाले रंगीन साजे जानि ना जे…

हे गाणे ऐकुया श्रीमती सुचित्रा मित्र ह्यांच्या सुरात..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.