अचेना के भय कि …

विदेशात फिरताना सगळ्या अनोळखी जागा मध्ये अचानक काही ओळखीचे सापडले कि खूप छान वाटते..स्वित्झर्लंड मध्ये आम्ही जिनेव्हा हुन झरमॅट ला ट्रेन ने जात होतो.. छोटी छोटी स्विस गावे दिसत होती, कधी पहाड तर कधी नदी तर कधी हिरवे गर्द जंगले पार करत ट्रेन धावत होती..मध्येच एक स्टेशन लागले आणि स्पेल्लिंग होते Sion..लगेच आठवले मुंबई त पण आहे सायन स्टेशन…पण त्या स्विस स्टेशन सायन चे ट्रेन announcement मध्ये उच्चारण झाले शीव ..मुंबई च्या सायन स्टेशन चे पण मूळ नाव शीव आहे..म्हणजे ते सायन पण शीव च आहे पण आपण स्पेल्लिंग नुसार सायन उच्चारण करतोय आणि ते चुकीचे आहे हे लक्षात आले.. वाटले इथल्या रेल्वे वर काम करणारा कुणी तरी तिथे मुंबई रेल्वे वर पण काम करत होता कि काय आणि त्यानेच हे स्टेशन नाव Sion (शीव ) ठेवले कि काय असे वाटले…

रवींद्र नाथाचे हे गीत अनोळखी जगता विषयी आहे..ते म्हणतात अपरिचित जगाचे का भय करावे? तिथे पण काही तरी परिचित दुवा अचानक समोर येतोच…अपरिचित जगामध्ये परिचित गोष्टी शोधण्यात आणि अनोळखी जगताला ओळखीचे करण्यातच खरी मजा आहे असे ते म्हणतात…

অচেনাকে ভয় কী আমার ওরে?
    অচেনাকেই চিনে চিনে উঠবে জীবন ভরে॥
জানি জানি আমার চেনা     কোনো কালেই ফুরাবে না,
         চিহ্নহারা পথে আমায় টানবে অচিন ডোরে॥
    ছিল আমার মা অচেনা, নিল আমায় কোলে।
    সকল প্রেমই অচেনা গো, তাই তো হৃদয় দোলে।
অচেনা এই ভুবন-মাঝে    কত সুরেই হৃদয় বাজে–
         অচেনা এই জীবন আমার,
                বেড়াই তারি ঘোরে॥

हे गीत मराठीत…

अचेना के भय कि आमार ओरे ??

(अचेना – अनोळखी , अपरिचित ..)

अचेना केइ चिने चिने उठबे जीवन भरे ..

(चेना – परिचित ..)

जानि जानि आमार चेना कोनो कालेई फुराबे ना ,

(फुराबे – संपणे ..)

चिन्हहारा पंथें आमाय टानबे अचिन डोरे …

छिलो आमार माँ अचेना, निलो आमाय कोले …

(कोले – कुशीत…)

सकल प्रेमई अचेना गो , ताई तो हृदय दॊले …

अचेना ए इ भुवन माझे कतो सुरेई हृदय बाजे —

अचेना ए इ जीवन आमार,

बेडाई तारी घोरे …

मरीयन चट्टर्जी ह्यांनी केलेले ह्या कवितेचे इंग्लिश रूपांतर इथे देत आहे…..मारियान चट्टर्जी बद्दल थोडे सांगावेसे वाटते.. त्या माझ्या फेसबुक मैत्रीण ..अमेरिकन आहेत.. रवींद्र नाथाच्या नितांत भक्त..रवींद्र नाथाचे साहित्य वाचण्या साठी त्यांनी बांगला भाषा शिकून घेतली..वर्षातून एकदा त्या कलकत्याला येतात..रवींद्र संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतात..आणि गातात हि खूप सुंदर…

WHY do I fear the unknown?
  When experiencing the unfamiliar fulfils my life.
  I know my quest for the unexplored will never end.
  An unknown force will pull me onto the untrodden path.
  Why do I fear the strange?
  My own mother was unknown to me,
  She took me upon her lap.
  Love itself is a mystery, so it stirs the soul.
  Within this undiscovered universe the heart beats to so many tunes,
  This life of mine is uncharted,
   so I roam about in a wondrous daze.  

     –Marian Chatterjee, unpublished manuscript, Jan 2015  

हे गाणे ऐकुया श्रीमती सुचित्रा मित्र ह्यांच्या आवाजात…

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.