कालिम्पोन्ग शहरापासून जवळच एक सुंदर ठिकाण आहे डेलो पार्क ..पहाडी शिखरावर एक हिरवे गार उद्यान आहे..इथून खाली वसलेल्या कालिंपोंग शहराचे आणि चारी बाजूला असलेल्या हिमाच्छादित शिखरांचे तसेच त्या मधून वाहणाऱ्या तिस्ता नदीचे मनोरम दर्शन होते..
इथेच para – gliding करायची संधी मिळाली..जमिनी वरून जेव्हा पाय विलग झाले आणि आकाशात उड्डाण केले तेव्हा अगदी पाचावर धारण बसली होती.. त्यावेळी जाणवले कि आपल्याला जमिनी वर पाय ठेवून चालायचे केवढी सवय असते.. माझा पायलट एक भारतीय सैन्य दलात काम केलेला एक अनुभवी माजी सैनिक होता..तो अगदी लीलया आकाशात उंच घेऊन गेला..आणि खाली नजर गेली.. तर केव्हढा विस्मय जनक नजारा …संध्याकाळ ची सूर्य किरणे मेघा तुन पहाडी शिखरावर चमकत होती..एक मेकात मिसळून बसलेल्या पर्वत रांगा त्यामध्ये पसरलेली धुक्याची दुलई..एका बाजूला कांचनजंगा दिसत होते.. कधी हिरवी गार जंगले तर कधी गवताळ कुरणे… खालची तीस्ता नदी तर अगदी एवढीशी दिसत होती..वाटले परमेश्वराची केव्हढी सुंदर निर्मीती आणि त्यावर आपले पक्षी होऊन आकाशातून ते विहंगम दृश्य न्याहाळणे एक once in a life time अनुभव …
ह्या गाण्यात रवींद्र नाथ हेच सांगतात..आकाश भर व्यापलेला सूर्य तारा .. आणि त्यामध्ये माझे विस्मय जनक स्थान.. असा मी किती भाग्यशाली…
আকাশভরা সূর্য-তারা, বিশ্বভরা প্রাণ,
তাহারি মাঝখানে আমি পেয়েছি মোর স্থান,
বিস্ময়ে তাই জাগে আমার গান॥
অসীম কালের যে হিল্লোলে জোয়ার-ভাঁটায় ভুবন দোলে
নাড়ীতে মোর রক্তধারায় লেগেছে তার টান,
বিস্ময়ে তাই জাগে আমার গান॥
ঘাসে ঘাসে পা ফেলেছি বনের পথে যেতে,
ফুলের গন্ধে চমক লেগে উঠেছে মন মেতে,
ছড়িয়ে আছে আনন্দেরই দান,
বিস্ময়ে তাই জাগে আমার গান।
কান পেতেছি, চোখ মেলেছি, ধরার বুকে প্রাণ ঢেলেছি,
জানার মাঝে অজানারে করেছি সন্ধান,
বিস্ময়ে তাই জাগে আমার গান॥
हे गाणे मराठी त …
आकाश भरा सुरज तारा, विश्व भरा प्राण,
ताहारि माझंखाने आमि पेये छि मोर स्थान,
( ताहारि माझंखाने – त्या मध्ये , पेये छि – मिळाले …)
विस्मयें ताई जागे आमार गान ….
असीम कालेर जे हिल्लोळे जोवार भाटा य भुवन दो ले ..
(अनादी काळा पासून हे विश्व डुलतेय भरती ओहोटीच्या तालावर… जोवार भाटा – भरती ओहोटी )
नाडी ते मोर रक्त धाराय लेगे छे तार टा ण,
(तोच ताल माझ्या धमन्या मध्ये मला जाणवतो...)
विस्मयें ताई जागे आमार गान …
घासे घासे पा फेले छि वनेर पंथे जेते ,
(गवताळ कुरणावर चालत जंगलमार्गी जाताना..)
फुलेऱ गंधे चमक लेगे उठे छे मन मेते…
(फुलाच्या सुवासाने मन धुंदावते…)
छडीये आछे आनंदेर इ गान
(सर्वत्रच व्यापून राहिलेय एक आनंद गान ...)
विस्मयें ताई जागे आमार गान …
का न पे ते छि , चोख मेले छि, ध रार बुके प्राण प्राण ढे ले छि,
(ऐकतो , निरखतो…ह्या पृथ्वी वर प्राण पणे प्रेम करतो…)
जानार माझे अजाना रे करे छि संधान,
(जाणीवे पलीकडील जे आहे त्याला शोधतो...)
विस्मयें ताई जागे आमार गान …
(त्या विस्मयातून स्फुरते हे गीत...)
ह्या गीताचे रवींद्र नाथानी केलेले इंग्रजी रूपांतर…
My heart sings at the wonder of my place
in this world of light and life;
at the feel in my pulse of the rhythm
of creation
cadenced by the swing of the endless time.
I feel the tenderness of the grass in my
forest walk,
the wayside flowers startle me;
that the gifts of the infinite are strewn
in the dust
wakens my song in wonder.
I have seen, have heard, have lived;
in the depth of the known have felt
the truth that exceeds all knowledge
which fills my heart with wonder and
I sing.
–Rabindranath Tagore, Poems, Visva-Bharati, 1942
हे गाणे ऐकुया सागर सेन ह्याच्या स्वरात….