ऐशो श्यामल शुंदोरो ….

कालच कवी गुरूंच्या जीवनातील एक गोष्ट वाचली ..किती छोटीशी खुमासदार कविता त्यांनी रचली..त्यांच्या अशा अनेक कविता, गाणी, गीती नाट्य आहेत..चार ओळींच्या लहान लहान कविता, ज्यांना आपण चारोळी म्हणतो त्या तर अविस्मरणीय..ह्या चार ओळींच्या कविता “स्फुल्लिंग ” या नावाने संग्रहित केलेल्या आहेत..

आता आपल्या कडे मान्सून सुरु झालाय आणि इथे ब्रिसबेन मध्ये पण दोन दिवस मस्त पाऊस पडतोय..

रवींद्रनाथांनी वर्षातल्या सहा ऋतु वर अगणित कविता केल्यात..गाणी रचलित..त्यामध्ये पावसाळा बहुतेक त्यांच्या आवडीचा..पावसाळ्याची बरीच गाणी आहेत किंवा मी ती जास्त ऐकलीत..असेच एक गाणे आज ऐकुया..

ऐशो श्यामल शुंदर

(हे श्यामल सुन्दरा बरसून ये )

हे गाणे बांगला लिपीमध्ये इथे देत आहे..

এসো শ্যামল সুন্দর,
          আনো তব তাপহরা তৃষাহরা সঙ্গসুধা।
          বিরহিণী চাহিয়া আছে আকাশে॥
          সে যে  ব্যথিত হৃদয় আছে বিছায়ে
                তমালকুঞ্জপথে সজল ছায়াতে,
                নয়নে জাগিছে করুণ রাগিণী॥
          বকুলমুকুল রেখেছে গাঁথিয়া,
          বাজিছে অঙ্গনে মিলনবাঁশরি।
                আনো সাথে তোমার মন্দিরা
                চঞ্চল নৃত্যের বাজিবে ছন্দে সে–
                বাজিবে কঙ্কণ, বাজিবে কিঙ্কিণী,
                ঝঙ্কারিবে মঞ্জীর রুণু রুণু॥

आता हेच गाणे मी देवनागरी लिपीत लिहिते..

ऐशो श्यामल सुंदर ..

(हे श्यामल सुंदर [मेघा बरसून ] ये )

आनो तब तापहारा तृषाहारा संगशु धा ..

(तुझे ताप हरण , तृषा हरण करणारे अमृत घेऊन ये )

बीरहिनी चाहिया आ छे आकाशे ..

(विरहिनी आकाशा कडे [नजर लावून ] राहिलीये )

से जे व्यथीत ह्रिदय आ छे बिछायें ..

(तिचे व्यथित ह्रिदय वाट पाहत आहे)

तमाल कुंज पंथे सजल छायाते ..

(तमाल [वृक्षाच्या] सजल सावलीत)

नयने जागिछे करुण रागिनी ..

(डोळ्यात उमटलीय करुण रागिणी )

बकुल मुकुल रेखे छे गाथिया ..

([तिने] बकुळ फुले गुंफ़लीत [माळेत ])

बाजी छे आन्गने मिलन बांशरि ..

([आणि ] वाजतेय अंगणात मिलन बासरी )

आनो साथे तोमार मंदिरा ..

(तुझी मंदिरा [तू ] सोबत आण )

चंचल नृत्येर बाजिबे छोन्दे शे …

(जी [मंदिरा ] चंचल नृत्यातालावर वाजेल)

बाजिबे कंकण, बाजिबे किंकिणी …

(कंकणे वाजतील ..वाजेल किंकिणी ..)

झंकारिबे मंजीर रुनू रुनू ……………………..

(मंजीर झंकारेल रुणू रुणू ….)

थोडक्यात, खूप तापलेली हि धरणी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे आणि तिचे वर्णन खूप सुंदर केलेले आहे..ह्या गाण्यात विविध वाद्यांचा (मंदिरा , मंजिर, किंकिणी ) उल्लेख आहे..हे गाणे आशा भोसलेनी सुंदर गायले आहे..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.