ह्या नाताळच्या सुट्टीत आम्ही उत्तर बंगाल मधील कालिम्पोन्ग ह्या जागी फिरायला गेलो..हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले एक छोटेसे शहर..दार्जिलिंग इथून जवळच आहे..पण दार्जिलिंग ला पर्यटकांची सुट्टीत खूपच गर्दी..ती टाळण्यासाठी कालिंपोंग ला गेलो..इथे नेपाळ, तिबेट मधून येऊन बरेच जण स्थायिक झाले आहेत..जवळचीच लावा, लोलेगाव, अलगरा, चारखोल अशी छोटी छोटी गावे पण बघून आलो…हिमाच्छादित कांचन जंगा पर्वत रांगांचे इथून खूप सुंदर दर्शन होते.. हिमालयाच्या दर्या खोऱ्यात चार दिवस शांत, निवांत पणे व्यतीत करण्यासाठी जरूर ह्या ठिकाणी जावे..
प्रत्येक ठिकाणी जाताना अरुंद हिमालयन रास्ता..एका बाजूला पर्वत रांगा तर दुसऱ्या बाजूला दरीत छोट्या छोट्या नद्या धावताहेत…ह्या नद्या तिस्ता नदीच्या उपनद्या..शेवटी तीस्तेचे प्रशस्त निळेशार पात्र दिसते..NHPC च्या hydro project जवळ बरेचसे तीस्तेचे पाणी अडवून ठेवले आहे..आमच्या ड्राइवर ने सांगितले ह्या तिस्ता नदीच्या पाण्यावरून भारत आणि बांगला देश मध्ये वाद सुरु आहेत..सगळी कडे भारतीय सैन्याचा वावर दिसत होता..फोटो काढणे निषिद्ध होते..वरती फोटोत दिसतेय ती रेली नदी, तीस्तेची एक उपनदी.. प्रवासाच्या शेवटी एक दिवस सिलिगुडी शहरात वास्तव्य केले ..तिथे पण तिस्ता सोबत होती..पण नदी पात्र बरेचसे कोरडे होते..
हे गाणे आहे रवींद्र नाथानी नदीला उद्देशून लिहिलेले..कवींनी अशी कल्पना केली कि हे गाणे नदीला म्हणतेय तिच्या किनारी असलेले एक चाफ्याचे झाड..
ওগো নদী, আপন বেগে পাগল-পারা,
আমি স্তব্ধ চাঁপার তরু গন্ধভরে তন্দ্রাহারা॥
আমি সদা অচল থাকি, গভীর চলা গোপন রাখি,
আমার চলা নবীন পাতায়, আমার চলা ফুলের ধারা॥
ওগো নদী, চলার বেগে পাগল-পারা,
পথে পথে বাহির হয়ে আপন-হারা–
আমার চলা যায় না বলা– আলোর পানে প্রাণের চলা–
আকাশ বোঝে আনন্দ তার, বোঝে নিশার নীরব তারা
हि कविता .मराठीत.
ओगो नदी, आपण बेगे पागल-पारा.
(हे नदी, वेड्यासारखी धावणारी तू..)
आमि स्तब्ध चांपार तरु गंधभरे तंद्रा हारा,
(तर मी स्तब्ध चाफा , सुवासाने तल्लीन…)
आमि सदा अचल था कि, गभीर चला गोपन राखि,
(मी सदा अचल आणि गंभीर..)
आमार चला नवीन पाताय, आमार चला फुलेऱ धारा ..
(माझी हालचाल म्हणजे हि नवीन पाने आणि फुले.. चला – चालणे, हालचाल .. )
ओगो नदी, चलार वेगे पागल पारा,
(हे नदी, तू धावतेस वेड्यासारखी…)
पंथे पंथे बाहिर होये आपन – हारा —
(प्रत्येक वळणावर बदलणारे तुझे रूप…)
आमार चला जाय ना बोला — आलोर पाने प्राणेर चला —
(माझी हालचाल निशब्द, (पण) प्रकाशाने नवीन जीवन मिळणारी..)
आकाश बोझे आनंद तार, बोझे निशार नीरब तारा ..
((माझी हालचाल समजून घेते हे आकाश आणि रात्रीचे शांत तारे…. बोझे – समजणे , समजून घेणे , जाणणे ..)
ह्या कवितेचा इंग्लिश अनुवाद…
MY shadow dances in your waves,
everflowing river,
I, the blossoming champak, stand unmoved on the bank,
with my flower-vigils.
My movement dwells in the stillness of my depth.
In the delicious birth of new leaves,
In flood of flowers,
In unseen urge of new life towards the light.
Its stirring thrills the sky, and the silence of the dawn is moved.
— Rabindra nath Tagore, The Cycle of Springs. (translated by C F Andrews and Nishikanta Sen).
हे गाणे ऐकुया हेमंत कुमार ह्यांच्या आवाजात…