हि कविता आहे पावसाळी आकाशात उडण्याऱ्या बगळ्यांच्या थव्याबद्दल…
एवढेसे हे पक्षी प्रत्येक वर्षी लांबचा पल्ला कापून त्यांच्या इच्छित स्थळी जातात..आमच्या घराजवळच एक सुंदर तलाव आहे..तलावाभोवती घनदाट झाडी .. आमचे नेहमीचे मॉर्निंग वॉक चे ठिकाण.. विविध पक्ष्यांचा तिथे अधिवास आहे..तलावाच्या दोन बाजूला प्लॅटफॉर्म केलेले आहेत आणि दुर्बीण ठेवल्या आहेत.. तुम्ही तिथून सुंदर पक्षी निरक्षण करू शकता..ह्या तलावात प्रति वर्षी हिवाळा संपत आला कि एक काळ्या राजहंसाची जोडी येते..तिथे त्यांचा संसार फुलतो..त्यांचे काळे कबरे पिल्लू मोठे झाले कि ते निघून जातात..एकदा दुर्बिणीतून बघताना दिसले होते.. त्या जोडीतला एक राजहंस अगदी मन लावून पाण्यामध्ये तलावातील वेली चोचीने एका जागी जमा करत त्यांचे राहायचे वसती स्थान घडवत होता..कुठून येतात आणि कुठे जातात कोण जाणे..
कवींना बहुतेक अशीच एक गर्द काळ्या नभाच्या पार्श्व भूमीवर उडणारी बगळ्यांची किंवा राजहंसाची रांग दिसली .. ह्या गाण्यात त्याचे वर्णन आहे..
মেঘের কোলে কোলে যায় রে চলে বকের পাঁতি।
ওরা ঘর-ছাড়া মোর মনের কথা যায় বুঝি ওই গাঁথি গাঁথি॥
সুদূরের বীণার স্বরে কে ওদের হৃদয় হরে
দুরাশার দুঃসাহসে উদাস করে–
সে কোন্ উধাও হাওয়ার পাগলামিতে পাখা ওদের ওঠে মাতি॥
ওদের ঘুম ছুটেছে, ভয় টুটেছে একেবারে,
অলক্ষ্যেতে লক্ষ ওদের– পিছন-পানে তাকায় না রে।
যে বাসা ছিল জানা সে ওদের দিল হানা,
না-জানার পথে ওদেরले নাই রে মানা–
ওরা দিনের শেষে দেখেছে কোন্ মনোহরণ আঁধার রাতি॥
हेच गाणे मराठी त
मेघेर कोले कोले जाय रे चो ले बके र पा ति ..
( नील नभी उडे हंस माला )
ओ रा घर छा डा मोर मनेर कथा जाय बुझि ओई गां थि गां थि ..
(गृह ही न त्यांच्या सवे गुंफलीय हि विचार मा ला..)
सुदुरेर बीनार स्वरे के ओ देर हृदय हारे
(दूर देशीचे कोण वीणेचे सूर त्यांना मोहवताहेत)
दुराशार दुःसाहसें उदास करे ….
(दुराशा आणि दु:साहसी असे हे (त्यांचे ) उड्डाण )
शे कोन उधाव होआर पागला मीते पाखा ओ देर उठे माति ..
(सुसाट वाऱ्यावर वेड्यासारखे पसरलेत (त्यांनी) पंख )
ओ देर घूम छू टे छे , भय टूटे छे एकेबारे ,
(नाही निद्रा , (त्यांना) नाही भय … [घूम – झोप , निद्रा ] )
अल खेते लख्ख ओ देर – पिछोन पाने ताकाय ना रे..
(दूर वर त्यांचे लक्ष्य .. (त्यांना) नाही मागे वळायचे .. (लक्ख – लक्ष्य ))
जे बाशा छिलो जाना शे ओ देर दिलो हाना ,
(जे (त्यांचे) परिचित वास स्थान , ते आता नाही उपयोगाचे… [ बाशा – घर ] )
ना-जानार पथे ओ देर नाहि रे माना —
(अपरिचित स्थानी जाण्या (त्यांची ) ना नाही )
ओरा दिनेर शेषे देखे छे कोन मनोहरन आधार रा ति …
(खुणावतेय (त्यांना) दृ ष्टी पल्याडचे अ दृष्ट )
रमा मंडल च्या आ वाजा त हे गाणे देत आहे..