रथ यात्रा ….

खूप वर्षा पूर्वी ओरिसा फिरायला गेलो होतो..पुरी चे जगन्नाथ मंदिर..कोणार्क..नंदन कानन चे प्राणी संग्रहालय पाहून आलो..पुरीच्या समुद्रावर उठणाऱ्या त्या मोठं मोठ्या लाटा अजून आठवतात…कोणार्क चे सूर्य मंदिर ला काळ्या दगडातील ताज महाल म्हटले जाते..अचूक वेळ दर्शवणारी सूर्य मंदिराची ती दगडी चाके एक मानवी करामतीचे आश्चर्यच.. आमचा guide ने बरीच माहिती पुरवली..कोणार्क च्या सूर्य मंदिराच्या उंच शिखरावर एक रत्न माणकाने भरलेला कलश ठेवला होता..सकाळी सूर्योदय झाला कि सूर्याची किरणे प्रथम त्या कलश वर पडून सारी कोणार्क नागरी उजळून निघायची..दुर्दैवाने, मंदिरात आत प्रवेश उपलब्ध नव्हता..guide ने सांगितले कि आत गाभाऱ्यात सूर्य नारायणाची मूर्ती (म्हणजे एक धातूचे तबक) होते आणि चुंबकीय गुणधर्माने ते अधांतरी राहायचे..

जगन्नाथ मंदिराचे वास्तू शिल्प अविस्मरणीय…छोट्या प्रवेश दारातून आत प्रवेश केला कि प्रथम कृष्ण, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती दृष्टीस पडतात..आत खूप गर्दी होती..मी तर अगदी शेवटी भिंती जवळ उभे राहून दर्शन घेतले..पण तुम्ही जिथेही कुठं उभे राहाल तिथून त्या मूर्ती स्पष्ट दिसतात..त्यांचे ते विशिष्ट प्रकारे रंग केलेले डोळे पूर्ण गाभारा भरून आहेत असे वाटते..एक अद्भुत अनुभव..

गेल्या महिन्यात, रथ यात्रा साजरी केली गेली..हा मुख्यतः ओरिसा राज्याचा सण ..ह्या दिवशी कृष्ण, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती रथात बसून येतात…अनेक लोक मिळून तो रथ ओढतात..रथाची पूजा करतात..इथे ब्रि स्बे न मध्ये पण इस्कॉन तर्फे रथ यात्रा साजरी होते..पश्चिम बंगाल मध्ये हा सण घरोघरी साजरा होतो..लहान मुले छोटे छोटे लाकडाचे रथ बनवतात..त्यात कृष्ण, बालरामचे फोटो ठेवले जातात..आणि ते रथ हि मुले ओढत प्रत्येक घरी घेऊन जातात..जिलेबीचा प्रसाद वाटलं जातो…ती एक आनंद यात्राच असते..

रवींद्रनाथांची हि छोटीशी कविता.. रथ यात्रा …

রথযাত্রা, লোকারণ্য, মহা ধুমধাম,
ভক্তেরা লুটায়ে পথে করিছে প্রণাম।
পথ ভাবে আমি দেব রথ ভাবে আমি,
মূর্তি ভাবে আমি দেব—হাসে অন্তর্যামী।

हि लघु कविता मराठीत लिहिते..

रथयात्रा, लोकराण्य , महा धुमधाम,

(रथ यात्रा..हि गर्दी..खूप धुमधाम..[लोकारण्य – गर्दी ..])

भक्तेरा लुटाये पथे करिछे प्रणाम …

( भक्त जन करताहेत साष्टांग प्रणाम..[लु टा ये साष्टांग , करि छे — करताहेत .].)

पथ भाबे आमि देब रथ भाबे आमि ,

(रस्त्याला वाटते मी (स्वतःच )देव ..रथ पण समजतो मीच देव..[भाबे – विचार करतो .].)

मूर्ति भाबे आमि देब — हाशे अंतर्यामी …

(मूर्ती (पण) चिंतिते मीच देव , हसतो अंतर्यामी ..)

(हाशें – हसे , स्मित ..)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.