विदुषक

कांची च्या राजाने कर्णाट राज्यावर हल्ला केला…ह्या युध्दात कांची राजा विजयी झाला..राजाला कितीतरी चंदन काष्ठ, हस्तिदंत, सोना माणिक रत्ने मिळाली त्याची गणती नाही..

परतीच्या वाटेवर राजाने बलीश्वरी देवीच्या मंदिरात बली देऊन पूजा अर्चा केली..

पूजा करून राजा येत होता – लाल वस्त्र नेसलेला, गळ्यात जास्वदींच्या फुलाची माळ, कपाळी रक्त चंदनाचा टिळा; बरोबर मंत्री आणि विदुषक …

त्याने पहिले, एका जागी आमराईत मुले खेळत होती..

राजा त्याच्या दोन साथीदारांना म्हणाला, “चला बघूया, काय खेळताहेत??”

मुले दोन बाहुले घेऊन युद्ध यद्ध खेळत होती..

राजाने विचारले, “कुणाचे युद्ध??”

मुले म्हणाली, ” कर्नाट बरोबर कांची चे”…

राजाने विचारले, “अच्छा, कोण जिंकले बरं??”

मुले अभिमानाने उत्तरली, ” कर्नाट जिकंले आणि कांची पराभूत..”

मंत्र्याचा चेहरा गंभीर..राजाचे डोळे रागाने लाल , विदुषक हा हा करून हसू लागला…

राजा जेव्हा सेने समवेत परतत होता, तेव्हा हि मुले खेळतच होती.

राजाने हुकूम सोडला, “धरा ह्या मुलांना, बांधून ठेवा झाडांना आणि काढा वेताने फोडून..”

गावातून आई वडील धावून आले..म्हणाले, “मुले लहान, अबोध..त्यांना माफ करा..”

राजाने सेनापतीला बोलावून हुकूम केला, “ह्या गावाला असा धडा शिकवा कि कांची च्या राजाला कधीच विसरणार नाहीत..”

आणि राजा शिबीरात परतला.

संध्याकाळी, सेनापती समोर येऊन उभा राहिले. प्रणाम करून म्हणाले, “महाराज, आता ह्या गावात कोल्ही कुत्री सोडून कुणाच्या तोंडून काही शब्द नाही…”

मंत्री म्हणाले, “महाराजांचा विजय असो..”

पुरोहित म्हणाले, “विजयी भव, राजा..”

विदूषक म्हणाला, “महाराज, मला आता निरोप द्या..”

राजा ने विचारले, “का?”

विदूषक उत्तरला, “मला मारता येत नाही, मला लढता पण येत नाही..परमेश्वराच्या कृपेने मला फक्त हसता येते..महाराजांच्या सभेत राहिलो तर मी हसणे विसरून जाईन..”

— रवींद्रनाथ ठाकूर..

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.